Instagram वर लाख फॉलोअर्स अन् लाखात पगार, पण ही सुंदरी फक्त कॉम्प्युटरचा खेळ; 'हे' गुपित वाचून धक्का बसेल

Vrutika Patel: सोशल मीडियाची दुनिया किती वेगाने बदलत आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सध्या चर्चेत असलेली वृतिका पटेल.

जाहिरात
Read Time: 3 mins
Vrutika Patel: ही 'फेक' मुलगी केवळ प्रसिद्धच नाही, तर दर महिन्याला घरबसल्या लाखो रुपये कमावत आहे.
मुंबई:

Vrutika Patel: सोशल मीडियाची दुनिया किती वेगाने बदलत आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सध्या चर्चेत असलेली वृतिका पटेल. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पाहून लाखो तरुण घायाळ होतात, हजारो लोक तिला फॉलो करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? वृतिका नावाची मुलगी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही! हो, हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण वृतिका ही हाडामांसाची मुलगी नसून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे AI च्या मदतीने तयार केलेली एक डिजिटल सुंदरी आहे. ही 'फेक' मुलगी केवळ प्रसिद्धच नाही, तर दर महिन्याला घरबसल्या लाखो रुपये कमावत आहे.

काय असते AI इन्फ्लुएंसरची भानगड?

AI इन्फ्लुएंसर म्हणजे असे डिजिटल कॅरेक्टर जे तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन केलेले असतात. त्यांना हुबेहूब माणसांसारखा लूक, हावभाव आणि व्यक्तिमत्व दिले जाते. वृतिका पटेलच्या बाबतीतही हेच घडले आहे. तिचे सर्व फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट एका टीमद्वारे AI टूल्स वापरून तयार केल्या जातात. 

Advertisement

आज हे तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, एखादा फोटो खरा आहे की कॉम्प्युटरने बनवलेला, हे ओळखणे साध्या डोळ्यांना जवळजवळ अशक्य झाले आहे. वृतिकाचे सध्या इन्स्टाग्रामवर 113,000 फॉलोअर्स आहेत.

कमाईचा आकडा वाचून व्हाल थक्क

फेब्रुवारी 2026 मध्ये आलेल्या बिझनेस ऑफ फॅशनच्या एका रिपोर्टनुसार, या डिजिटल सुंदऱ्या केवळ दिसायलाच भारी नाहीत, तर कमाईतही खऱ्या माणसांना मागे टाकत आहेत. वृतिका पटेलच्या बाबतीत बोलायचे झाले तर, तिच्या इन्स्टाग्रामवर 300 पेड सबस्क्राइबर्स आहेत. प्रत्येक सबस्क्रायबर तिला दरमहा 399 रुपये देतो. 

केवळ या एकाच मार्गातून तिची महिन्याची कमाई 1,19,700 रुपये इतकी होते. याशिवाय ब्रँड प्रमोशन, जाहिराती आणि इतर मार्गांतून येणारा पैसा वेगळाच!

Advertisement

कंपन्यांना या 'फेक' फोटोंमध्ये का रस आहे?

AI इन्फ्लुएंसरचा ट्रेंड वाढण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. सर्वात मुख्य म्हणजे यांना कंट्रोल करणे सोपे असते. या डिजिटल मॉडेल्स कधीही थकत नाहीत, त्यांना कोणत्याही वादात अडकण्याची भीती नसते आणि त्या 24/7 सक्रिय राहू शकतात. कंपन्यांसाठी हा एक स्वस्त आणि खात्रीशीर पर्याय ठरत आहे. यामुळेच मोठे ब्रँड्स आता खऱ्या मॉडेल्सऐवजी अशा एआय कॅरेक्टर्सना पसंती देत आहेत.

Advertisement


( नक्की वाचा : Raja Shivaji: रितेशच्या चित्रपटात महाराजांची युद्धनीती चुकीची दाखवली? 'वाघनखांच्या' प्रसंगाचा इतिहास काय आहे? )

प्रगती की फसवणूक? सोशल मीडियावर मोठा वाद

एकीकडे तंत्रज्ञानाची ही भरारी पाहून लोक थक्क होत असतानाच दुसरीकडे मोठा वादही रंगला आहे. काही युजर्सच्या मते, हे केवळ तंत्रज्ञान नसून लोकांची फसवणूक आहे. अशा अकाउंट्सचा वापर चुकीच्या कामांसाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकंदरित, सोशल मीडियावर आपण जे पाहतो ते नेहमीच खरं असतं असं नाही, हेच या वृतिका पटेलच्या प्रकरणावरून सिद्ध होत आहे.


( स्पष्टीकरण : ही बातमी सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओच्या आधारे करण्यात आली आहे. NDTV त्याची पृष्टी करत नाही.)
 

Topics mentioned in this article