Who Is Shadab Jakati: एका डायलॉगने आयुष्य बदललं! 5 कोटी VIEWS अन् रातोरात स्टार; कोण आहे शादाब जकाती?

Who Is Shadab Jakati Know This Meerut Star: '१० रुपये वाला बिस्किट का पैकेट कितने का दिया जी...' हा डायलॉग आज सोशल मीडियावर प्रत्येकाच्या तोंडी बसला आहे. याच अनोख्या शैलीमुळे मेरठच्या इंचौली गावातील शादाब जकाती आता इंटरनेट सेन्सेशन बनले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Who Is Shadab Jakati Know This Meerut Star: '१० रुपये वाला बिस्किट का पैकेट कितने का दिया जी...' हा डायलॉग आज सोशल मीडियावर प्रत्येकाच्या तोंडी बसला आहे. याच अनोख्या शैलीमुळे मेरठच्या इंचौली गावातील शादाब जकाती आता इंटरनेट सेन्सेशन बनले आहेत. त्यांच्या व्हिडिओवर केवळ सामान्य लोकच नव्हे, तर प्रसिद्ध गायक बादशाह आणि क्रिकेटर रिंकू सिंह सारखे सेलिब्रिटीही रील्स बनवून हा ट्रेंड फॉलो करत आहेत. यासोबतच, हा व्हिडिओ बनवणारे शादाब जकाती यांचीही खूप चर्चा होत आहे. आता त्यांच्या रील्स बनवण्याच्या पॅशनची कहाणी समोर आली आहे. (Trending Reelstar Shadab Jakati News)

व्हिडिओ कसा झाला व्हायरल?| How Shadab Jakati Reel Goes Viral

व्हायरल व्हिडिओमध्ये शादाब (Shadab Jakati) एका किराणा दुकानावर पोहोचतात. ते विचारतात की, ‘१० रुपयांचा बिस्किटाचा पुडा कितीला दिला?' (10 Rupaye Ka Biscuit Kitne Ka Hai Ji) दुकानदाराला त्यांच्या बोलण्यावर राग येतो. तो म्हणतो, ‘१० रुपयांचा बिस्किट कितीला असेल?' यावर शादाब म्हणतात, ‘विचारावे तर लागेल ना.' दुकानदार रागावलेला असतानाही, प्रेक्षकांना शादाब यांची वाकडी-तिकडी चाल आणि मजेदार डायलॉग डिलिव्हरी खूप आवडली. याच अनोख्या शैलीमुळे शादाब पाहता पाहता इंटरनेट स्टार बनले.

शादाब जकातीचा संघर्ष मोठा| Shadab Jakati Struggle

शादाब जकाती यांची कहाणी सोपी नाही. एका न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात ड्रायव्हर म्हणून नोकरी करून केली. यासाठी ते सौदी अरब मध्येही गेले होते. तेथूनच त्यांनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या आवडीला कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. शादाब म्हणतात की, कुटुंबानेही साथ दिली नाही, लोक त्यांची खिल्ली उडवत होते आणि टोमणे मारत होते. 

व्हिडिओ बनवण्याच्या आवडीमुळे त्यांनी अखेर सौदी अरबमधील नोकरी सोडली, कारण तिथे कंटेंट (content) बनवण्यावर बंदी होती. आर्थिक अडचणींचा सामना करूनही त्यांनी हिंमत सोडली नाही. रील्स बनवणे सुरूच ठेवले. अखेर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोक त्यांना ओळखू लागले. शादाब सांगतात की, त्यांच्या लोकप्रियतेमागे सर्वात मोठे कारण गायक बादशाह आहेत. बादशाह यांनी त्यांच्या डायलॉगवर रील बनवून पोस्ट केला, जो व्हायरल झाला. त्यानंतर देशभरातील लोक आणि सेलिब्रिटी या ट्रेंडला फॉलो करू लागले. शादाब म्हणाले की, 'मी बादशाह भाईंचा मनापासून आभारी आहे. त्यांनीच मला प्रसिद्धी मिळवून दिली.'

Advertisement

  आजारामुळेच मिळाली प्रसिद्धी|Shadab Jakati slip disc Desease 

शादाब स्लिप डिस्क (slip disc) या आजाराने त्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांची चाल वाकडी झाली आहे. आज त्यांची हीच वाकडी चाल त्यांची ओळख बनली आहे. लोक याला त्यांच्या शैलीचा एक भाग मानून पसंत करत आहेत. प्रसिद्ध झाल्यानंतरही शादाब आजही मेरठमधील आपल्या लहान घरात साधे जीवन जगत आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी रोज मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी पोहोचत आहेत. शादाब सांगतात की, काही अ‍ॅड कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत आणि त्यांना ऑफरही आल्या आहेत. मात्र, त्यांना चित्रपटांची आवड नाही. 'मी फक्त रील्स बनवून आनंदी आहे. मला एक साधा माणूस म्हणूनच राहायचे आहे', असे ते म्हणतात.