Husband And Wife Bonding Viral Post : संसार-प्रपंच सुरळीत ठेवण्यासाठी पैसा किती महत्त्वाचा असतो,हे अनेकांना महितच आहे. पैशाचं सोंग करता येत नाही,असंही म्हणतात. पैसै नसतील तर संसार प्रपचांचा गाडा पलटी झाल्याशिवाय राहत नाही, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. पत्नी नोकरीला नसले, तर कुटुंबाची सर्व जबाबदारी पतीच्या खांद्यावरच असते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी खूप महत्त्वाची असते. विशेषत: त्या व्यक्तींसाठी ज्यांच्याकडे पैशांचा किंवा उद्योगाचा दुसरा पर्याय नसतो. पण एका पतीला चार महिन्यांपासून नोकरी मिळाली नाही. त्यानंतर त्याच्या पत्नीने रेडिटवर लिहिलेली पोस्ट सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
नोकरी ही आनंदाची किल्ली असते.पण ती नसेल तरी काही बिघडत नाही.नवरा–बायकोमध्ये प्रेम असेल तर नोकरी असणे किंवा नसणे फारसं महत्वाचं राहत नाही. एका रेडिट पोस्टमध्येही एका पत्नीने याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. पत्नीने तिच्या पतीने दिलेल्या एका छोट्याशा भेटीचा उल्लेख केला आहे.'किंमतीने स्वस्त, पण प्रेमाच्या दृष्टीने खूपच मौल्यवान'
बेरोजगार पतीला लोकांनी दिली नोकरीची ऑफर
Vivid_Employed या नावाने केलेल्या रेडिट पोस्टमध्ये एका पत्नीने म्हटलंय की, मागील चार महिन्यांपासून माझ्या पतीला नोकरी मिळत नव्हती. तरीसुद्धा पतीने मला भेटवस्तू घेतली. या गिफ्टमध्ये एक छोटंसा टेडी आणि चॉकलेट्स होते. पतीला मी सुद्धा खर्चासाठी मदत केलीय. पण महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी हे सर्व पतीच माझ्यासाठी करत होता. पोस्टमध्ये असंही नमूद केलं आहे की, गेल्या काही महिन्यांत त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला.
पत्नी कॉपीरायटर आहे आणि घरून काम करते. पतीची नोकरी नसल्यामुळे अडचणी तर होत्याच. पण ज्या पैशातून पती स्वतःचा खर्च भागवू शकला असता, त्याच पैशातून त्याने पत्नीला भेटवस्तू देऊन आनंदी ठेवलं. या पोस्टमध्ये नवरा–बायकोच्या नात्याचा खरा अर्थ काय असतो, याचं उदाहरण देण्यात आलं आहे. आहे. कठीण काळातही एकमेकांवर प्रेम करणे आणि ऐकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहणे, हेच खऱ्या पार्टनरचं लक्षण असतं.ही पोस्ट व्हायरल होताच लोकांनी पतीला नोकरीची ऑफर देण्यास सुरुवात केलीय. तसच या कपलला लोकांनी आशीर्वादही दिला आहे.