Viral Video : तरुणीने हॉटेलचं रुम बुक केलं अन् नंतर घडला भयानक प्रकार! 5 मिनिटांतच उघडकीस आलं की..

ऑनलाईन वेबसाईट्सद्वारे पैशांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात. एका तरुणीसोबत तिच्यासोबत अशाचप्रकारचा धक्कादायक प्रकार घडल्याचं इन्स्टाग्रामच्या व्हिडीओत सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman Shocking Video Viral

Woman Shocking Video Viral :  ऑनलाईन वेबसाईट्सद्वारे पैशांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात. एका तरुणीसोबत तिच्यासोबत अशाचप्रकारचा धक्कादायक प्रकार घडल्याचं इन्स्टाग्रामच्या व्हिडीओत सांगितलं आहे. तरुणीने व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, "नामी रिसॉर्टमध्ये बुकिंग करायचे होते.त्यासाठी इंटरनेटवर सर्च केलं. सर्वात आधी जी वेबसाईट दिसली, त्या साईटवर असलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि रुम बुक करून पेमेंटही केले. पण यात फसवणूक झाल्याचं कळलं. बोगस वेबसाईटला 24100 रुपयांचं पेमेंट झाल्याचं उघडकीस आलं". तरुणीसोबत नेमकं काय घडलं? पाहा इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या तरुणीचा व्हिडीओ..

तरुणीने व्हिडीओत म्हटलंय, काही क्षणातच 24100 रुपयांचं नुकसान झालं.रायपूरमधील मायरा रिसॉर्टमध्ये ऑनलाइन बुकिंग केलं होतं. पण ती वेबसाईट बोगस निघाली आणि मोठा फटका बसला. या स्कॅमविषयी तयार केलेला व्हिडीओ लोकांसाठी एक शिकवण असल्याचंही तिने म्हटलं आहे.  @Thatdreamyduo या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून रिसॉर्टच्या फेक बेवसाईटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 

ऐश्वर्याने सायबर क्राईममध्ये तक्रार नोंदवली अन्..

इन्स्टाग्रामवरील या पोस्टच्या माहितीनुसार, सुरुवातीला ऐश्वर्याकडे 12,000 + 100 रुपये मागण्यात आले. त्यानंतर टेक्निकल एरर सांगून आणखी 12,000 रुपये घेतले गेले. पैसे लगेच रिफंड केले जातील,असंही सांगण्यात आलं होतं. पण थोड्याच वेळात तो नंबर नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं. याबाबत ऐश्वर्याने सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली आहे. 

Advertisement

पेमेंट केल्यानंतर ऐश्वर्याने लगेचच रिसॉर्टच्या खऱ्या वेबसाइटवर संपर्क साधला,तेव्हा तिला अशी माहिती देण्यात आली की,  “तुमचे पैसे गेले आहेत.” म्हणजेच, मायरा हॉटेलच्या नावाने बनावट वेबसाइट चालू असल्याची त्यांना कल्पना आहे,पण तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.या पोस्टवर कमेंट करणारे लोक मायरा रिसॉर्टलाच जबाबदार धरत आहेत. एका यूजरने कमेंटद्वारे प्रश्न उपस्थित केला आहे की, “रिसॉर्टने अजूनपर्यंत काहीच कारवाई केलेली नाही,म्हणजे ते स्वतः या स्कॅमचा भाग तर नाही ना?”

Disclaimer : या बातमीतील माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. एनडीटीव्ही मराठी कोणत्याही माहितीची पुष्टी करत नाही.