First Sunrise Of 2026 In The World : थर्टी फर्स्टचा समारोप करून जगभरात नवीन वर्ष 2026 चं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं. सोशल मीडियावर मेसेज,फोटो-व्हिडीओ शेअर करून लोकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.पण जगात सर्वात आधी सुर्योदय कुठे होतो? या प्रश्नाने तर अनेकांची झोपच उडवली.पण या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. किरिबाटी (Kiribati) असं या बेटाचं नाव असून या ठिकाणी सर्वात आधी सुर्योदय होतो. हे बेट प्रशांत महासागरात स्थित आहे आणि UTC+14 टाइम झोनमध्ये येते.याच कारणामुळे हे जगातील ते पहिले ठिकाण ठरते,जिथे 1 जानेवारीची मध्यरात्र सर्वात आधी येते.किरिबाटीला क्रिसमस आयलंड असेही म्हणतात. त्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये वेळेनुसार नवीन वर्षाची सुरुवात होते.
काय आहे यामागचा इतिहास?
भारतामध्ये जेव्हा 31 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजतात,तेव्हा प्रशांत महासागरातील किरिबाटी गणराज्याच्या बेटावर नवीन वर्षाची सुरुवात झालेली असते. खास UTC+14 टाइम झोन हे यामागचं कारण आहे.जे जगातील सर्वात पुढे मानलं जातं. सन 1995 मध्ये किरिबाटी सरकारने जाणूनबुजून इंटरनॅशनल डेट लाईन (International Date Line) त्यांच्या बाजूने फिरवून घेतली,जेणेकरून देश एकाच तारखेत राहील आणि आर्थिक व प्रशासकीय कामे सोपी होतील.
नक्की वाचा >> OTT Web Series 2026 : 'पंचायत 5', 'हीरामंडी 2' ते 'मटका किंग', 2026 मध्ये येतायत झोप उडवणाऱ्या 'या' 8 वेबसीरिज
भौगोलिकदृष्ट्या हे बेट भूमध्य रेषेजवळ,ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला आणि अमेरिकेच्या पश्चिमेला स्थित आहे आणि जगातील सर्वात मोठ्या कोरल एटोल्सपैकी एक मानले जाते.हेच ऐतिहासिक आणि भौगोलिक कारण आहे की, दरवर्षी सर्वात आधी इथेच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन होते.जिथे स्थानिक लोक साधेपणाने,पारंपरिक गाणी-संगीत आणि सामूहिक प्रार्थनांसह नवीन वर्षाचे स्वागत करतात.
नवीन वर्ष 2026 चे स्वागत
न्यूझीलंडने नवीन वर्ष 2026 चे स्वागत केले. ऑकलंड शहरातील देशातील सर्वात उंच इमारत स्काय टॉवरवरून पाच मिनिटे भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.240 मीटर उंच टॉवरवरून जवळपास 3,500 फटाके सोडण्यात आले,ज्यामुळे मध्यरात्रीचे आकाश उजळून निघाले.