दीड वर्षाच्या लेकरासह 17 जण जिवंत जळाले, चारमिनारजवळील आगीच्या दुर्घटनेचे PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: IANS
Image credit: PTI

हैदराबादमधील गुलजार हाऊसमध्ये भीषण अग्नितांडव घडले. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय, तर काही लोक जखमी झाले आहेत.

Image credit: PTI

रविवारी (18 मे 2025) पहाटेच्या सुमारास हे अग्नितांडव घडले आहे.

Image credit: PTI

ही दुर्घटना ऐतिहासिक वास्तू चारमिनारजवळ घडलीय. 

Image credit: PTI

दुर्घटनमध्ये आठ लहान मुलांचा मृत्यू झालाय, यापैकी एक जण केवळ दीड वर्षाचे बाळ होते.

Image credit: PTI

प्रथम (दीड वर्ष), इराज (2 वर्ष), आरुषी (3 वर्ष), अनुयान (3 वर्ष), ऋषभ (4 वर्ष), इद्दू (4 वर्ष), प्रियांश (4 वर्ष), हमेय (7 वर्ष),अभिषेक(31 वर्ष)

Image credit: ANI

रजिनी (32 वर्ष), शीतल (35 वर्ष), वर्षा (35 वर्ष), पंकज (36 वर्ष), सुमित्रा (60 वर्ष), राजेंद्र मोदी (65 वर्ष), प्रल्हाद (70 वर्ष), मुन्नी (70 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

Image credit: AP/PTI

जखमी झालेल्या चिमुकलीला अ‍ॅम्ब्युलन्समध्ये नेताना फायबर ब्रिगेडचे जवान.

Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

Image credit: PTI

पीएमएनआरएफतर्फे मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहितीही PM मोदींनी दिलीय.   

Image credit: PTI

प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती पोलीस महासंचालक (डीजीपी) जितेंद्र यांनी दिलीय.

आणखी वाचा

Trans Womenना पीरियड्स येतात का? अनाया बांगर म्हणाली...

marathi.ndtv.com