Alert! भारतात HMPV व्हायरसचा शिरकाव, 2 बाळांना संसर्ग; आरोग्य विभागाने बोलावली तातडीची बैठक
Edited by Harshada J S
Image credit: Canva
चीनमधील धोकादायक व्हायरस ह्युमन मेटान्युमोव्हायरसचा (HMPV) भारतामध्ये शिरकाव झाल्याचे म्हटले जात आहे.
Image credit: Canva
कर्नाटमध्ये HMPV व्हायरसची दोन प्रकरणे समोर आली आहेत. 3 आणि 8 महिन्यांच्या मुलीला संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: Canva
या दोन्ही बाळांना बंगळुरुतील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यापैकी 3 महिन्यांच्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आलाय.
Image credit: Canva
तर 8 महिन्यांच्या बाळावर औषधोपचार सुरू आहेत, तिच्या प्रकृतीत सुधारणा होतेय.
Image credit: Canva
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही बाळ दुसऱ्या देशांमध्ये जाऊन भारतात आल्याची माहिती नाही.
Image credit: Canva
शहरात HMPVचे दोन रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलावलीय.
Image credit: Canva
वर्ष 2023मध्ये नेदरलँड, ब्रिटन, फिनलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड स्टेट्स आणि चीनमध्ये HMPVचे रुग्ण आढळले होते.
Image credit: Canva
HMPV सामान्यतः खोकला आणि शिंकाद्वारे पसरतो. याव्यतिरिक्त संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या स्पर्शामुळेही हा व्हायरस झपाट्याने पसरतो.
Image credit: Canva
संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसांत रुग्णामध्ये आजाराची लक्षणे दिसू लागतात.
Image credit: Canva
आणखी वाचा
धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी जबरदस्त उपाय
marathi.ndtv.com