धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी जबरदस्त उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

धूम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि काही लोक ही सवय सोडवण्यासाठी प्रयत्नही करतात. जाणून घेऊया काही सोप्या टिप्स...

Image credit: Canva

नियमित कमीत कमी दोन कप दूध प्यावे. धूम्रपानाची इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही एक कप दूध पिऊ शकता. 

Image credit: Canva

रेन्बो डाएट फॉलो करा, ज्यामध्ये फळभाज्यांचा समावेश करावा. याद्वारे शरीरातील टॉक्सिन्स सहजरित्या बाहेर फेकले जातील. 

Image credit: Canva

तुम्ही सलग कामामध्ये व्यस्त राहिलात तर धूम्रपान करण्याची इच्छा होणार नाही. 

Image credit: Canva

पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि पचनप्रक्रियाही सुधारेल. धू्म्रपानाची सवय सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनीही जास्तीत जास्त पाणी प्यावे. 

Image credit: Canva

धू्म्रपानाची इच्छा होईल त्यावेळेस अननस किंवा द्राक्ष, गाजर, काकडीसारखी फळे खा. 

Image credit: Canva

धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी एखादे नियम किंवा डाएट नाहीय, पण या टिप्स नक्कीच कामी येतील.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुम्हीही उभे राहून पाणी पिताय का? या गंभीर समस्यांचा करावा लागेल सामना

marathi.ndtv.com