'दंगल 2 येतोय...' आमिरने विनेश फोगाटला केला VIDEO CALL

Image credit: Aamir Khan All India Fans Club Insta
Image credit: PTI

कुस्तीपटू विनेश फोगाटचे पॅरिस ऑलिम्पिकमधील मेडल थोडक्यासाठी हुकले. 

Image credit: IANS

फायनल मॅचपूर्वी विनेशचे 50 ग्रॅम वजन अधिक झाल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. 

Image credit: IANS

विनेशच्या या कठीण काळादरम्यान देशवासीय तिच्यासोबत उभे राहिले. सेलिब्रिटींनीही तिच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या होत्या. 

Image credit: IANS

नुकतेच सोशल मीडियावर विनेश फोगाट-आमीर खानचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Image credit: ANI

सुपरस्टार आमीर खान आणि विनेश फोगाट व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. 

Image credit: IANS

आमीर विनेशला शुभेच्छा देत असल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय. यावेळेस विनेशच्याही चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत आहे. 

Image credit: ANI

सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. 

Image credit: ANI

'दंगल 2 येतोय...', अशा कमेंट्स युजर्संकडून करण्यात येत आहेत. 

Image credit: IANS

सुपरहिट 'दंगल' सिनेमा 2016मध्ये रिलीज झाला होता, यानंतर चाहते आता 'दंगल 2' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

आणखी वाचा

'विराट कोहलीच्या आक्रमकतेने मला प्रभावित केलंय'

marathi.ndtv.com