मित्रांचे आभार मानणार नाही, संतोष जुवेकर पुन्हा असं काहीतरी का म्हणाला ? 

Edited by Harshada J S Image credit: Santosh Juvekar Insta
Image credit: Santosh Juvekar Insta

अभिनेता संतोष जुवेकरला सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ट्रोल केले जात आहे. 

Image credit: Santosh Juvekar Insta

नेटकरी कितीही त्याला ट्रोल करत असले तरीही सच्च्या मित्रांनी त्याची साथ सोडली नाही. 

Image credit: Santosh Juvekar Insta

अवधुत गुप्तेसह संपूर्ण मराठी इंडस्ट्री त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. 

Image credit: Santosh Juvekar Insta

मित्रांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबाबत संतोष जुवेकरला विचारले असता त्याने नेमके काय म्हटलं? जाणून घेऊया...

Image credit: Santosh Juvekar Insta

माझ्यावर प्रेम करणारी, मी नेमका कसा आहे, हे जे जाणतात ते लोक माझ्या पाठीशी आहेत. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो: संतोष

Image credit: Santosh Juvekar Insta

मी त्यांचे आभार मानणार नाही. आपल्या माणसांचे आभार मानू नये. मला त्यांना परकं करायचं नाहीय: संतोष 

Image credit: Santosh Juvekar Insta

पण त्यांच्यावर माझं प्रेम आहे. त्यांचा मला आदर आहे : संतोष

Image credit: Santosh Juvekar Insta

कदाचित मी कुठेतरी विचारांनी हललो असेन. कुठल्या तरी दुःखात असेन : संतोष

Image credit: Santosh Juvekar Insta

पण माझ्या मित्रांनी पुन्हा एकदा त्यातून बाहेर काढलं आणि मला उभं केलंय: संतोष

Image credit: Santosh Juvekar Insta

असे मित्र प्रत्येकाला मिळावे अशी इच्छा आहे,अशीही भावना संतोषने तारांगण चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलीय. 

आणखी वाचा

राहुल द्रविडच्या पुतणीचा साखरपुडा पार पडला, कोण आहे होणारा जावई?

marathi.ndtv.com