लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतून नयनाची एक्झिट?
Edited by Harshada J S
Image credit: Star Pravah Insta
Image credit: Isha Keskar Insta
स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे.
Image credit: Star Pravah Insta
कला खरे आणि अद्वैत चांदेकर यांच्यातील प्रेम, वादावादी, भांडणं पाहणे प्रेक्षकांना खूप आवडतंय.
Image credit: Akshar Kothari Insta
कमी कालावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालाय.
Image credit: Star Pravah Insta
दरम्यान लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आलाय.
Image credit: Star Pravah Insta
खलनायिका नयना खरेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा सपकाळने मालिका सोडल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: Star Pravah Insta
अपूर्वाने मालिका का सोडली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान तिने तिचे इन्स्टा अकाउंटही डिअॅक्टिव्हॅट केले आहे.
Image credit: Star Pravah Insta
दरम्यान आता नयना खरे हे पात्र कोण साकारणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
Image credit: Sanika Banaraswale Insta
रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सानिका बनारसवाले नयना खरेच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Sanika Banaraswale Insta
यापूर्वीही काही मालिकांमध्ये सानिकाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
आणखी वाचा
तीव्र विरोधानंतर छावा सिनेमातील त्या सीनवर कात्री, मंत्र्यांनी मानले जाहीर आभार
marathi.ndtv.com