अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, भीषण दुर्घटनेचे PHOTOS
 Edited by Harshada J S Image credit: ANI             Image credit: ANI    अहमदाबाद विमानतळाजवळ मेघानीनगर परिसरात मोठी दुर्घटना घडलीय. 
             Image credit: PTI    गुरुवारी (12 जून) दुपारच्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं. 
                टेकऑफ घेताना एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला.
 Image credit: PTI                अपघातग्रस्त विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने प्रवास करत होते आणि यामध्ये 242 प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 
 Image credit: PTI             Image credit: ANI    अपघातानंतर परिसरात तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. 
             Image credit: ANI    PM मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापु यांच्याशी बातचित केली.
             Image credit: ANI    PM मोदींनी दोघांनाही अहमदाबादकडे जाणाऱ्या आणि या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या लोकांना तत्काळ मदत करण्यास सांगितलंय. 
             Image credit: ANI    दुर्घटनेमध्ये कित्येक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
             Image credit: PTI    विमान अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आलंय. 
             Image credit: PTI    जखमींना औषधोपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 
             Image credit: PTI    केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापु आणि गुजरातचे CM भुपेंद्र पटेल यांनी एअर इंडिया विमान दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय.
             Image credit: PTI    केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी 'X'वर पोस्ट करत शोक व्यक्त केलाय.
             Image credit: PTI    अहमदाबादमधील विमान अपघाताबाबतची माहिती ऐकून धक्का बसला आणि दुःख झालंय:नायडू
             Image credit: PTI    आम्ही अलर्ट आहोत. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे:नायडू
             Image credit: PTI    सर्व विमान वाहतूक आणि आपत्कालीन संस्थांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत:नायडू
             Image credit: PTI    बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत आणि घटनास्थळी वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत:नायडू
             Image credit: PTI    दरम्यान पायलटने मे-डे कॉल दिला होता, पण टेक ऑफनंतर लगेचच विमान कोसळले.
             Image credit: PTI    विमानामध्ये दोन पायलट, 10 केबिन क्रूसहीत 242 प्रवासी होते.
             Image credit: PTI    एअर ट्रॅफिक कंट्रोलनुसार, एअर इंडियाचे फ्लाइट एआय-171ने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.39 वाजता अहमदाबाद एअरपोर्टच्या रनवे 23 वरुन उड्डाण भरलं होते.
             आणखी वाचा
   हो मीच हे केलंय... राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात सोनमची कबुली
    marathi.ndtv.com