इवल्याशा बियांचे पौष्टिक लाडू, त्वचेपासून ते केसांपर्यंत मिळतील जबरदस्त फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

आरोग्य निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पौष्टिक लाडू-चिक्की, खाकरा इत्यादी पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा. 

Image credit: Canva

पण हे पदार्थ बाजारातून विकत आणण्याऐवजी घरच्या घरीच तयार करू शकता. 

Image credit: Canva

अळिवाचे लाडू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. जाणून घेऊया रेसिपी...

Image credit: Canva

सामग्री- अळीव, किसलेले ओले खोबरे, गूळ, सुकामेवा, साजूक तूप, जायफळ पावडर, वेलची पावडर

Image credit: Canva

सर्वप्रथम अळीव निवडून घ्या. 2 ते 3 तास अळीव नारळ पाण्यामध्ये भिजत ठेवा. 

Image credit: Canva

गॅसच्या मध्यम आचेवर कढईमध्ये तूप गरम करा. त्यामध्ये गूळ वितळवून घ्यावा. 

Image credit: Canva

गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले अळीव आणि खोबरे चांगले मिक्स करून घ्या. 

Image credit: Canva

सर्व मिश्रण व्यवस्थित शिजू द्यावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये सुकामेवा, जायफळ पूड आणि वेलची पूड मिक्स करावी. 

Image credit: Canva

लाडूचे मिश्रण तयार झाल्यानंतर ते थंड होऊ द्यावे आणि लाडू वळून घ्यावे. 

Image credit: Canva

अळिवामध्ये लोह, फॉलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, फायबर, प्रोटीन हे गुणधर्म असतात. 

Image credit: Canva

अळिवातील पोषणतत्त्वामुळे शरीरातील रक्त वाढते, केसांशी संबधित समस्याही सुटतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पटापट वेटलॉस करायचंय? सकाळपासून ते रात्रीपर्यंत असे फॉलो करा डाएट रुटीन

marathi.ndtv.com