पटापट वेटलॉस करायचंय? सकाळपासून ते रात्रीपर्यंत असे फॉलो करा डाएट रुटीन

Edited by Harshada J S Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत डाएट प्लान कसा असावा? जाणून घेऊया डेली रुटीन...

Image credit: Canva

सकाळी 7-8वाजेदरम्यान नाश्ता करावा. नाश्त्यामध्ये ओटमील, उपमा, पोहे खाऊ शकता. 

Image credit: Canva

भाज्या किंवा दलियायासह दोन उकडलेली अंडी किंवा कमी तेल वापरून केलेली अंड्याची पोळीही खाऊ शकता. 

Image credit: Canva

सकाळी 10 ते 11 दरम्यान एखादे फळ, सुकामेवा खाऊ शकता. 

Image credit: Canva

दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान जेवण करावे. जेवणामध्ये सॅलेड, 1-2 मिक्स कडधान्यांची किंवा बाजरीची पोळी आणि भाजी खावी. 

Image credit: Canva

एक वाटी डाळ, एक वाटी दही किंवा एक ग्लास ताकाचाही दुपारच्या जेवणामध्ये समावेश करावा. 

Image credit: Canva

संध्याकाळी ग्रीन टी किंवा हर्बल टी प्यावा. मोड आलेल्या मुगासह टोमॅटो, कांदा, लिंबाचा रसही मिक्स करावा किंवा फ्रुट स्मूदीही पिऊ शकता. 

Image credit: Canva

संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत रात्रीचे जेवण करावे. हलक्या स्वरुपातील जेवण केल्यास उत्तम. 

Image credit: Canva

सूप, भाजी, क्विनोआ किंवा ब्राऊन राइस अथवा मल्टीग्रेन पोळी खाऊ शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

दुधामध्ये तूप आणि हळद मिक्स करून पिण्याचे फायदे

marathi.ndtv.com