सकाळी लसणच्या 2-3 पाकळ्या चावून खाल्ल्यास मिळतील इतके फायदे

Edited by Harshada J S  Image credit: Canva

लसूण आरोग्यासाठी फायदेशीर असते. रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणापूर्वी लसणाच्या 2-3 पाकळ्या खाल्ल्यास मोठे लाभ मिळू शकतात.

Image credit: Canva

लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, ज्यामुळे सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. 

Image credit: Canva

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, यामुळे विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या फेकले जाते. रक्तप्रवाहही सुधारतो.

Image credit: Canva

लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होत नाही. वजनही घटते. 

Image credit: Canva

पोटाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. लसणातील पोषकघटकांमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. गॅस, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्याही दूर होतात. 

Image credit: Canva

लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळीही नियंत्रणात राहते.

Image credit: Canva

लसूण त्वचेसाठीही फायदेशीर असते. मुरुम, त्वचेवरील सुरकुत्या यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. 

Image credit: Canva

केसगळतीची समस्या दूर होते आणि केसांची चांगली वाढही होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यास तूप खाल्लेले चालते?

marathi.ndtv.com