Weight Loss: या छोट्याशा हिरव्या फळामुळे फॅट्स होतील झटकन बर्न, चेहऱ्यावरही येईल ग्लो

Edited by Harshada J S Image credit: Rashmika Mandanna Instagram 

वजन कमी करण्यासाठी लोक नको-नको ते उपाय करतात. पण याऐवजी हे छोटेसे फळ चावून खाल्ले तर आरोग्यास कित्येक फायदे मिळतील. 

Image credit: Canva

वजन कमी करण्यासाठी आवळा खाणे पोषक मानले जाते. आवळ्यामध्ये पोषक घटकांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार वजन कमी करण्यासाठी आवळ्यामुळे मोठी मदत मिळू शकते. कसे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

आवळा खाल्ल्यास चयापचयाची क्षमता सुधारते. यामुळे शरीरातील कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

फायबरचे उत्तम स्त्रोत म्हणजे आवळा. फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही.

Image credit: Canva

आवळ्यामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या बाहेर फेकले जातात. आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे यकृत डिटॉक्स होते. 

Image credit: Canva

आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्सचेही प्रमाण अधिक असते, जे फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करतात.

Image credit: Canva

आवळा खाल्ल्यास शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो. 

Image credit: Canva

आवळ्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि शरीर अ‍ॅक्टिव्हही राहते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पातेल्यातून दूध ओतू जाणार नाही, फॉलो करा शेफची 'ही' ट्रिक

marathi.ndtv.com