पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मुंबईच्या सुपुत्राला वीरमरण
Edited by Harshada J SImage credit: Ravindra Chavan Insta
Image credit: PTI
पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात मुंबईकर जवान शहीद झाला आहे.
Image credit: PTI
जवान एम. मुरली नाईक यांना वीरगती प्राप्त झालीय.
नाईक हे घाटकोपर परिसरात वास्तव्यास होते. ते मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिलीय.
Image credit: N Chandrababu Naidu X
सध्या सुरू असलेल्या कठीण प्रसंगात देशासाठी शत्रूंविरोधात लढत असताना नाईक यांना वीरगती प्राप्त झाली.
Image credit: PTI
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय.
Image credit: PTI
भारतीय सैन्याने दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली.
गुरुवारी (8 मे) रात्री पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, उधमपूरसह लष्करी स्थळांवर ड्रोन-मिसाइल हल्ले करण्याचाही प्रयत्न केला.
Image credit: PTI
पण भारताने पाकिस्तानचा डाव पूर्णतः हाणून पाडला.
Image credit: PTI
दरम्यान सीमा भागातील तणाव पाहता देशभरात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Image credit: PTI
आणखी वाचा
पाकिस्तानने 15 ठिकाणांना केले टार्गेट, भारतीय सैन्याने हाणून पाडला डाव