पाकिस्तानने 15 ठिकाणांना केले टार्गेट, भारतीय सैन्याने हाणून पाडला डाव
Edited by Harshada J S
Image credit: ANI
Image credit: PTI
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके परिसरातील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले.
7 मे रोजी पहाटेच्या सुमारास भारताने पाकिस्तानविरोधात ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.
Image credit: PTI
Image credit: ANI
तसेच भारतीय सैन्यावर हल्ला झाला तर त्यास योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल,असंही पाकिस्तानला ठणकावण्यात आले होते.
Image credit: ANI
याचाच एक भाग म्हणजे भारताने गुरुवारी (8 मे 2025) पाकिस्तानचा मोठा डाव उधळून लावत जशास तसे प्रत्युत्तर दिले.
Image credit: ANI
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, 7-8 मेदरम्यान रात्री पाकिस्तानने ड्रोन-क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील काही ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Image credit: ANI
पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, जालंधरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील काही ठिकाणांना लक्ष्य केले होते.
Image credit: ANI
पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला.
Image credit: ANI
पाकिस्तानच्या ड्रोन-क्षेपणास्त्रांचे काही अवशेष देखील सापडले आहेत.
Image credit: ANI
गुरुवारच्या कारवाईत (8 मे) भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील काही ठिकाणी एअर डिफेंस रडार आणि सिस्टमही टार्गेट केले.
आणखी वाचा
कर्नल सोफिया कुरेशींचे राणी लक्ष्मीबाईंशी काय आहे कनेक्शन? VIDEO VIRAL
marathi.ndtv.com