'जनतेला सुखी ठेव, बळीराजाचे दुःख दूर कर', CM शिंदेंनी विठुरायाकडे घातले साकडे
Edited by Harshada J S
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
17/07/2024
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा केली.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
यंदा नाशिकमधील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
अहिरे दाम्पत्यासोबत पूजा करण्याचे सौभाग्य मिळणे हा माझ्यासाठी बहुमान ठरला- CM एकनाथ शिंदे
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
विठुरायाच्या चरणी लीन होत जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, अशी प्रार्थना CM शिंदेंनी केली.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
मुख्यमंत्र्यांचे वडील,पत्नी, मुलगा डॉ.श्रीकांत, सून, नातू यांनीही सलग तिसऱ्यांदा विठुरायाची महापूजा केली.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले - CM शिंदे
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
गेली 3 वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे, असेही मागणे CM शिंदेंनी मागितले.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/07/2024
महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
Image credit: CM Eknath Shinde Instagram
आणखी वाचा
प्रशासनाचे दुर्लक्ष, रिक्षा चालकांनीच भरले रस्त्यावरील खड्डे
marathi.ndtv.com