कोळसा खाणीत अडकले 9 कामगार, 3 दिवसांनंतर एकाचा सापडला मृतदेह
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील उमरांगसो परिसरात कोळसा खाणीमध्ये 9 कामगार अडकले आहेत.
Image credit: PTI आसामचे CM हिमंता बिस्वा सरमा 8 जानेवारीला दिलेल्या माहितीनुसार, खाणीत अडकलेल्या कामगारांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय.
Image credit: PTI खाणीच्या तळातून पॅरा डायव्हर्सनी कामगाराचा मृतदेह काढला. आमच्या सहवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत, असेही त्यांनी म्हटलंय.
Image credit: PTI बचावकार्य सुरू केल्यानंतर तीन दिवसांनी या मजुराचा मृतदेह सापडलाय.
Image credit: PTI अन्य आठ मजुरांचीही वाचण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
Image credit: PTI बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि लष्करासह NDRFचे जवान खाणीमध्ये उतरल्याचंही सरमा यांनी सांगितले.
Image credit: PTI ज्या ठिकाणी कामगार अडकले, तेथे अवैधरित्या खाणकाम केले जात होते, अशी माहिती मुख्यमंत्री सरमांनी दिलीय.
Image credit: PTI अवैध खाणकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सरमांनी सांगितले.
Image credit: PTI अवैध कोळसा खाणकाम प्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केलीय.
Image credit: PTI खाणीत अडकलेल्या 9 मजुरांपैकी एकजण नेपाळमधील नागरिक असल्याची माहिती आहे.
Image credit: PTI गंगा बहादुर श्रेठ, हुसैन अली, जाकिर हुसैन, सर्पा बर्मन, मुस्तफा शेख, खुशी मोहन राय, संजीत सरकार, लिजान मगर आणि शरत गोयरी अशी मजुरांची नावे आहेत.
आणखी वाचा
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान आणि मतमोजणीची ठरली तारीख
marathi.ndtv.com