दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान आणि मतमोजणीची ठरली तारीख
Edited by Harshada J S Image credit: IANS
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Image credit: Canva
निवडणूक आयोगाने 7 जानेवारीला निवडणुकीची तारीख जाहीर केली.
Image credit: IANS
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे.
Image credit: PTI
दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत, त्यापैकी 58 सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर 12 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.
Image credit: Canva
दिल्लीत एकूण 1.55 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत.
Image credit: Canva
एकूण मतदारांपैकी 83.49 लाख पुरुष, 71.74 लाख महिला मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलीय.
Image credit: Canva
तरुण मतदारांची (20 ते 21 वर्षे) संख्या 28.89 लाख, तर पहिल्यांदाच मतदानास पात्र तरुणांची संख्या 2.08 लाख आहे.
Image credit: Canva
कुमार यांनी असेही सांगितले की, दिल्लीत 2697 ठिकाणी एकूण 13,033 मतदान केंद्रे असतील आणि त्यापैकी 210 मॉडेल मतदान केंद्रांचा समावेश आहे.
Image credit: Canva
दिल्लीत आम आदमी पार्टी (आप), भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे.
Image credit: PTI
दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी 36 हा बहुमताचा आकडा पार करावा लागेल.
Image credit: Canva आणखी वाचा
HMPVचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये?
marathi.ndtv.com