अटल सेतूच्या टोलबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: IANS

दैनंदिन प्रवासाकरिता तुम्ही देखील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचा वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

Image credit: PTI

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (28 जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.

Image credit: ANI

बैठकीमध्ये अटल सेतूहून प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या टोलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

Image credit: PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. 

Image credit: ANI

अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पार करणे शक्य झालंय. 

Image credit: ANI

अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर टोल आकारणी करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Image credit: ANI

म्हणजे 31 डिसेंबर 2025पर्यंत 250 रुपयेच टोल आकारणी करण्यात येणार आहे. 

Image credit: ANI

4 जानेवारी 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत MMRDAने प्रस्तावित केलेल्या दराच्या 50% सवलतीच्या दराने टोल आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. 

Image credit: ANI

22 किलोमीटर लांबीचा अटल सेतू प्रकल्प 13 जानेवारी 2024 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आणखी वाचा

राज्यातील खेळाडूंसाठी फडणवीस सरकारचा मोठा प्लान

marathi.ndtv.com