जय हिंद... Axiom-4 मिशनवर जाताना शुभांशू शुक्लांनी पहिल्या मेसेजमध्ये काय म्हटले?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: AP
भारताने आपल्या अंतराळ प्रवासात आणखी एक ऐतहासिक झेप घेतलीय.
शुभांशू शुक्लांसह अन्य तीन अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अॅक्सिओम-4 मोहीमच्या SpaceXच्या फाल्कन 9 रॉकेटने यशस्वीरित्या उड्डाण भरलंय.
Image credit: AP
फ्लोरिडाच्या कॅनेडी स्पेस सेंटरहून अंतराळवीरांचे यान प्रक्षेपित करण्यात आले.
Image credit: PTI
या खास प्रसंगी देशाला अभिमान वाटावा, अशी आमची इच्छा आहे; असे भारताच्या शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या पहिल्या संदेशात म्हटलं.
Image credit: AP
41 वर्षांनंतर पुन्हा अंतराळात आहोत. माझ्या खांद्यावरील तिरंगा सांगतोय की मी तुमच्यासोबत आहे. हा प्रवास अद्भुत आहे :शुभांशू शुक्ला
Image credit: AP
Image credit: PTI
भारताची अंतराळ संस्था इस्रोचे प्रतिनिधित्व या मोहिमेचे पायलट शुभांशू शुक्ला करत आहेत.
Image credit: PTI
शुभांशू यांच्यासोबत नासाच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिट्सन आहेत, ज्या मिशन कमांडर आहेत.
Image credit: PTI
पोलंडमधील ESA अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की-विस्निव्स्की, हंगेरीतील टिबोर कापू हे तज्ज्ञ म्हणून मोहिमेत सहभागी झाले आहेत.
भारत, हंगेरी आणि पोलंडसाठी ही मोहीम दीर्घकाळानंतर मानवी अंतराळ उड्डाणाच्या वापसीचे प्रतीक दर्शवते.
Image credit: AP
आणखी वाचा
भाजलेले चणे खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळतील?
marathi.ndtv.com