डाएटमध्ये या गोष्टींचा करा समावेश, झटपट होईल केसांची वाढ
Edited by Harshada J S Image credit: Canva
ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटऐवजी डाएटमध्ये काही पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास नक्की मदत मिळेल.
Image credit: Canva
अंडे हे प्रोटीन आणि बायोटिनचे उत्तम स्त्रोत आहे. नियमित एक अंडे खाल्ल्यास केसांची वाढ होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
पालकमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॉलेट असते.
Image credit: Canva
पालकमधील पोषणतत्त्वांमुळे स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
Image credit: Canva
दह्यामध्ये प्रोटीनसह व्हिटॅमिन बी5चे प्रमाण जास्त असते. डाएटमध्ये दह्याचा समावेश केल्यास केसांची वाढ जलदगतीने होईल.
Image credit: Canva
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्साइसिन नावाचे तत्त्व असते, यामुळे स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि केसांची वाढ होते.
Image credit: Canva
केसांच्या वाढीसाठी डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास केसगळती, केस तुटणे यासारख्या समस्या कमी होतील.
Image credit: Canva
डाएटव्यतिरिक्त केसांना तेल लावून मसाज करावा तसेच योग्य शॅम्पू कंडिशनर वापरावा.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सुकामेव्यावर मध लावून खाण्याचे फायदे
marathi.ndtv.com