सुकामेव्यावर मध लावून खाण्याचे फायदे
Edited by Harshada J S
Image credit: Canva
काही लोक सुकामेवा भिजवून तर काही जण तसेच खातात. पण सुकामेवा मधासह खाण्याचे फायदे माहिती आहेत का?
Image credit: Canva
मध आणि सुकामेवा एकत्रित खाणे यासाठी फायदेशीर मानले जाते कारण त्यामध्ये फॅट्स तसेच अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
Image credit: Canva
मनुके-जर्दाळू मधासह खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. याद्वारे शरीराला पोटॅशिअम, फायबरसारख्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
Image credit: Canva
मधासह सुकामेवा खाल्ल्यास नैसर्गिक साखरेची पातळी वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
काजूमध्ये प्रोटीन, झिंक आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. मधासह काजू खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
Image credit: Canva
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, फायबर असते. मधासह बदाम खाल्ल्यास हाडे मजबूत होतील.
Image credit: Canva
मध-सुकामेवा एकत्रित खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते.
Image credit: Canva
मध आणि सुकामेवा एकत्रित खाल्ल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात फायबर मिळते. पचनप्रक्रिया देखील सुधारते.
Image credit: Canva
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते, जे मेंदूसाठी पोषक असते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्यास काय होते?
marathi.ndtv.com