काळेभोर आणि मजबूत केसांसाठी वापरा 'हे' हेअर मास्क
Edited by Harshada J S Image credit: Shraddha Kapoor Insta केसगळती रोखण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक असंख्य उपाय करतात. पण काही केल्या समस्या दूर होत नाही.
Image credit: Canva केसगळती रोखण्यासाठी आवळा-कोरफडपासून घरच्या घरी हेअर मास्क तयार करा.
Image credit: Canva आवळा-कोरफडचे प्रमाण समसमान ठेवा. मिक्सरमध्ये आवळा वाटून त्याचा रस काढून घ्यावा.
Image credit: Canva कोरफडीचा ताजा गर घ्यावा. घरामध्ये कोरफडीचे रोप नसेल तर मार्केटमध्ये मिळणारे जेल वापरू शकता.
Image credit: Canva हेअर मास्क तयार करण्यासाठी दोन चमचे नारळाचे तेल, आवळा-कोरफड जेल एकत्र करा.
Image credit: Canva कोंड्याची समस्या असल्यास मास्कमध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करावा.
Image credit: Canva केसांवर हे मास्क लावा. यानंतर मऊ कापड गरम पाण्यात भिजवा आणि पिळा, त्यानंतर या कापडाने केस हलके बांधून ठेवा.
Image credit: Canva गरम पाण्याच्या कापडामुळे स्कॅप्ल हेअर मास्कमधील पोषणतत्त्व शोषून घेईल.
Image credit: Canva तासाभरानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. या हेअर मास्कमुळे केस पूर्वीपेक्षा मऊ आणि चमकदार होतील.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
बकरीचे दूध प्यायल्याने काय होते?
marathi.ndtv.com