काळवंडलेले अंडरआर्म्स पटकन होतील गोरे, करा 3 प्रभावी घरगुती उपाय
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva काळवंडलेल्या मानेप्रमाणे अंडरआर्म्सची जागा देखील कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे तसेच आरोग्याशी संबंधित कारणांमुळे काळी पडते.
Image credit: Canva अंडरआर्म्सची काळी पडलेली त्वचा गोरी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊया.
Image credit: Canva ठराविक घरगुती उपाय नियमित केल्यास अंडरआर्म्सची काळी पडलेली त्वचा हळूहळू सुधारण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva तांदळाच्या पिठामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. आठवड्यातून दोनदा या मिश्रणाने स्क्रब करावे.
Image credit: Canva तांदळाच्या पिठामुळे अंडरआर्म्सच्या मृत त्वचेची समस्या दूर होईल आणि रोमछिंद्रे स्वच्छ होऊन काळपटपणा कमी होईल.
Image credit: Canva दही आणि मधाचे मास्क अंडरआर्म्सवर लावा. 15 मिनिटांनंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ करावी.
Image credit: Canva दही-मधाच्या मास्कमुळे अंडरआर्म्सची त्वचा मऊ आणि सतेज होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva मुलतानी मातीमध्ये दूध मिक्स करुन अंडरआर्म्सवर लावा. पाच मिनिटे अंडरआर्म्सचा मसाज करावा. 10 मिनिटानंतर अंडरआर्म्स पाण्याने स्वच्छ करावे.
Image credit: Canva मुलतानी मातीमुळे अंडरआर्म्सला येणाऱ्या दुर्गंधाची समस्या दूर होईल. काळपटपणाही दूर होईल.
Image credit: Canva हे उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. त्वचेची जळजळ झाल्यास किंवा खाज आल्यास उपाय करणे टाळावे.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
मधुमेहाच्या रुग्णांनी फळं का खाऊ नये? डॉक्टरांनी सांगितलं मोठे कारण...
marathi.ndtv.com