निरोगी केसांसाठी पौष्टिक डाएट
Image credit: Sonalee Kulkarni Instagram
केसांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी पौष्टिक डाएट फॉलो करणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
कोणकोणत्या पदार्थांमुळे केस सुंदर राहण्यास मदत मिळेल, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
अंडी, चिकन, मासे, डाळी, सुकामेवा, दही यासारखा प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करावे. प्रोटीनमुळे केस मजबूत होतात.
Image credit: Canva
गाजर, रताळे, पालक, पिवळ्या-हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए अधिक असते. यामुळे सीबमचे उत्पादन वाढते व केसांना मॉइश्चराइझर मिळते.
Image credit: Canva
संत्रे, लिंबू, स्ट्रॉबेरी,कीवी, ब्रोकली या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते. यामुळे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
बदाम, सूर्यफुलाच्या बिया, पालक, अॅव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन ई अधिक असते;ज्यामुळे केसांचे संरक्षण होते व स्कॅल्पचे आरोग्यही निरोगी राहते.
Image credit: Canva
अंड्याचे बलक, सुखामेवा, बिया, रताळ्यामध्ये बायोटिन असते. बायोटिनमुळे केस वाढतात व केसांचे पातळ होणेही रोखले जाते.
Image credit: Canva
लाल मांस, पालक, बिया, मसूर, भोपळ्याच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे केसगळती रोखण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
भोपळ्याच्या बिया, काजू, चणे, दह्यामध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते. झिंकमुळे केसांची चांगली वाढ होते व स्कॅल्पचे आरोग्यही निरोगी राहते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Hair Tips: ही फळे खाल्ल्यास केस झटपट वाढतील आणि होतील काळेभोर
marathi.ndtv.com