केसातील कोंडा कमी करण्यासाठी रामबाण उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

हिवाळ्यामध्ये केसात कोंडा होणे ही फार सामान्य समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. 

Image credit: Canva

स्कॅल्पवर अ‍ॅलोव्हेरा जेल लावा. अ‍ॅलोव्हेरामध्ये अँटी फंगल-अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत, ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

नारळाच्या तेलामुळेही कोंड्याची समस्या कमी होऊ शकते. नारळ तेल लावल्यानंतर केस अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. 

Image credit: Canva

कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. कडुलिंबाच्या तेलाने स्कॅल्पचा मसाज करावा. 

Image credit: Canva

बदामाच्या तेलामध्ये गुलाब जल मिक्स करून केस आणि स्कॅल्पवर लावा. कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

एक कप दह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करा. 10 मिनिटांसाठी हे मिश्रण केसांवर लावा, त्यानंतर केस कोमट पाण्याने धुऊन घ्या. 

Image credit: Canva

संत्र्याच्या सालीची पेस्ट करा, त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट केसांवर लावा, यामुळे कोंडा कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पांढरे केस काढणे योग्य आहे का? वाचा उत्तर

marathi.ndtv.com