कडुलिंबाचा होममेड फेसवॉश तयार करण्याची पद्धत, चेहऱ्यावर येईल चमक
सामग्री : 10-15 कडुलिंबाची ताजी पाने, 5-6 तुळशीची पाने, 100 मिलीलीटर गुलाबपाणी, 1 छोटा चमचा लिंबाचा रस आणि मध
Image credit: Canva
कडुलिंबाच्या पानांपासून फेसवॉश तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया...
Image credit: Canva
कडुलिंबाची पाने आणि तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घ्या.
Image credit: Canva
गुलाब पाणी किंवा साध्या पाण्यामध्ये पाने मिक्सरमध्ये वाटा आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
Image credit: Canva
तयार झालेली पेस्ट एका स्वच्छ बाऊलमध्ये काढा.
Image credit: Canva
तुम्हाला हवे असल्यास त्यामध्ये लिंबाचा रस किंवा मध मिक्स करावा. यामुळे त्वचा उजळेल आणि त्वचेला मॉइश्चराइझर मिळण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
फेसवॉश तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि दोन-तीन मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा.
Image credit: Canva
थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा आणि कापडाने पुसावा.
Image credit: Canva
होममेड फेसवॉशमुळे त्वचेवर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
आणखी वाचा
तिळाच्या तेलाने मसाज करण्याचे फायदे
marathi.ndtv.com