केसांच्या वाढीसाठी खा 'या' पावरफुल बिया

Edited by Harshada J S Image credit: Canva 
Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी अनेकजण विविध प्रकारचे उपाय करतात. काही जण महागड्या स्वरुपातील केमिकल ट्रीटमेंट्सही करतात. पण यामुळे केसांचे नुकसानच होते. 

Image credit: Canva

केमिकलयुक्त ट्रीटमेंट्स करण्याऐवजी आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. 

Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या बियांमध्ये झिंक असते, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

Image credit: Canva

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. या बिया खाल्ल्यास केसांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

तिळातील पोषक घटक देखील केसांसाठी उपयुक्त ठरू शकतात, यामध्ये मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

Image credit: Canva

चिया सीड्स केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. यातील पोषकघटकांमुळे स्कॅल्पचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

Image credit: Canva

केसांच्या वाढीसाठी सूर्यफुलाच्या बिया देखील खाऊ शकता. सूर्यफुलाच्या बिया म्हणजे 'व्हिटॅमिन ई'चा उत्तम स्त्रोत. 

Image credit: Canva

जिऱ्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास स्कॅल्पच्या भागातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा 

महिनाभर उकडलेला बटाटा खाल्ल्यास काय होते?

marathi.ndtv.com