वडील शेवटच्या क्षणीही सांगत होते, माझ्या मुलामुलीसाठी जगू द्या: वैभवी देशमुख
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीटमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केलीय.
Image credit: IANS
वैभवी देशमुखने नेमके काय म्हटलंय, जाणून घेऊया सविस्तर...
चार्जशीटमधील फोटो पाहून आमचे कुटुंब, गावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय: वैभवी देशमुख
प्रत्येकाला या गोष्टीचे दुःख आहे. सर्वांना हेच वाटतंय हा प्रकार खंडणीमुळे झालाय: वैभवी देशमुख
माझ्या वडिलांची क्रूर हत्या करण्यात आली यामागे जे-जे लोक आहेत, ते खंडणी गोळा करण्यासाठी आमच्या मस्साजोगमध्ये आले होते: वैभवी देशमुख
त्यातून माझ्या वडिलांची हत्या घडलीय. नेमकी ही खंडणी कोणाकडे जात होती? खंडणी मागायला त्यांना कोणी पाठवलं?: वैभवी देशमुख
त्यांच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नाहीय. या लोकांवर कोणाचा वरदहस्त आहे?: वैभवी देशमुख
आमच्या कुटुंबावर आलेली वेळ कोणावरही येऊ नये: वैभवी देशमुख
माझे वडील शेवटी सुद्धा सांगताहेत मला माझ्या मुलामुलीसाठी जगू द्या, गावासाठी जगू द्या: वैभवी देशमुख
इतक्या अमानूषपणे त्यांना मारलं, यामागे कोणाचा हात आहे? हे सरकारने लवकरात लवकर कळवलं पाहिजे: वैभवी देशमुख
त्यांना सुद्धा सहआरोपी करून कठोरातील कठोर शिक्षा दिलीच पाहिजे: वैभवी देशमुख
आणखी वाचा
संतोष देशमुखांची अमानुष हत्या, मन विचलित करणारे पुराव्याचे PHOTOS समोर
marathi.ndtv.com