संतोष देशमुखांच्या हत्येचे भयावह फोटो, CIDकडून 1200 पानांचे आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा
Edited by Harshada J S
Image credit: IANS
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो 4 मार्चला समोर आले.
यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
Image credit: Dhananjay Munde X
धनंजय मुंडे यांनी राजीनामा सोपवलाय, मी तो स्वीकारलाय आणि राज्यपालांकडे पाठवलाय; अशी माहिती CM फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Image credit: PTI
मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवण्याची जोरदार मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती.
Image credit: PTI
3 मार्चला रात्री उशीरा CM फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत बैठक झाली.
Image credit: PTI
देशमुखांच्या हत्येचे भयावह फोटो आणि चार्जशीटचे फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली.
काही दिवसांपूर्वीच मुंडेंचा जवळचा सहकारी वाल्मीक कराड देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचे घोषित करण्यात आले.
Image credit: PTI
27 फेब्रुवारीला देशमुखांच्या हत्या आणि अन्य दोन संबंधित प्रकरणी CIDने कोर्टामध्ये 1200 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले.
आणखी वाचा
संतोष देशमुखांची अमानुष हत्या, मन विचलित करणारे पुराव्याचे PHOTOS समोर
marathi.ndtv.com