वेटलॉससाठी अशा पद्धतीने प्या हे लिक्विड, झटकन बर्न होतील कॅलरीज्

Edited by Harshada J S  Image credit: Sara Ali Khan Instagram 

वजन घटवण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर तुम्ही पिऊ शकता. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही व चयापचयाची क्षमताही सुधारते.

Image credit: Canva

पण थेट अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पिणे टाळा. कारण आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. दातांचेही नुकसान होऊ शकते. 

Image credit: Canva

एका ग्लास पाण्यात 2 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. जेवणाच्या अर्धा तासापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिऊ शकता. 

Image credit: Canva

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात डायल्युट करून प्यायल्यास वजन कमी होऊ शकते. यामुळे पोटावरील चरबी देखील घटण्यास मदत मिळेल.

Image credit: Canva

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा चहा देखील लाभदायक ठरेल. 1 कप हर्बल टीमध्ये 1 चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, थोडेसे मध व गरम पाणी मिक्स करा. 

Image credit: Canva

सॅलेडचे ड्रेसिंग तयार करण्यासाठीही अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापरू शकता. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये ऑलिव्ह ऑइलसह हिरव्या भाज्याही मिक्स कराव्यात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

सकाळी रिकाम्या पोटी हे छोटे दाणे खाण्याचे अगणित फायदे

marathi.ndtv.com