कडुलिंबाची पाने चावून खाण्याचे 8 फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

कडुलिंबाच्या पानांचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास काही शारीरिक समस्यांमधून सुटका होऊ शकते. 

Image credit: Canva

नियमित कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Image credit: Canva

कडुलिंबाचा पाला पाण्यात उकळा. ते पाणी थंड करून त्यापासून गुळण्या केल्यास दातांना कीड लागत नाही. 

Image credit: Canva

नियमित कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, पोटातील जंत यासारख्या समस्यापासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पाल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पाल्यातील गुणधर्मामुळे केस मजबूत होतात आणि कोंड्याची समस्याही कमी होते. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पाने चावून खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पानांचा लेप गुडघ्यांवर लावल्यास गुडघेदुखी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्यास ताप कमी होण्यासही मदत मिळते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

रिकाम्या पोटी भिजवलेली मुगाची डाळ खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com