Bigg Boss Marathi: रितेश देशमुखने निक्कीला मराठी माणसाची मागायला लावली माफी, कारण...

Edited by Harshada J S Image credit: Nikki Tamboli Instgram

बिग बॉस मराठी सीझन 5 पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे. वादविवाद, भांडणामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

Image credit: Nikki Tamboli Instgram

यामुळे पहिल्याच वीकेंड वारला रितेश देशमुखने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. विशेषतः निक्कीला त्याने धारेवर धरले होते.

Image credit: Nikki Tamboli Instgram

निक्कीने वर्षा उसगांवकरांसोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत रितेशने तिला चांगलेच फटकारले.

Image credit: Nikki Tamboli Instgram

इतकेच नव्हे तर मराठी माणसाची मेंटॅलिटी काढल्याबाबत त्याने निक्कीला मराठी माणसाची माफी मागायला लावली. 

Image credit: Nikki Tamboli Instgram

'ज्याला बोलायचं भान नाही, त्याला या घरात स्थान नाही', अशा शब्दांतही रितेशने निक्कीला फटकारले.

Image credit: Nikki Tamboli Instgram

निक्कीनेही यानंतर हात जोडून माफी मागितली.

Image credit: Nikki Tamboli Instgram

आर्या जाधवसोबत भांडण करताना निक्कीची जीभ घसरली आणि तिने मराठी माणसाच्या मेंटॅलिटीबाबत वादग्रस्त विधान केले. 

Image credit: Nikki Tamboli Instgram

निक्कीच्या भाषेवरूनच रितेशने वीकेंड वॉरला तिची कानउघडणी केली. 

Image credit: Nikki Tamboli Instgram

तसेच इथून पुढे चुकीचा व्यवहार खपून घेतला जाणार नाही, असा इशाराही निक्कीला दिली. 

Image credit: Nikki Tamboli Instgram

आणखी वाचा

Friendship Day 2024: श्रद्धा कपूरने फ्रेंडशिप डे असा केला साजरा

marathi.ndtv.com