जान्हवी किल्लेकरची 'या' मालिकेत होणार धमाकेदार एण्ट्री
Edited by Harshada J S
Image credit: Jahnavi Killekar Insta
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Image credit: Jahnavi Killekar Insta
जान्हवीने बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवले होते. ग्रँड फिनालेमध्ये 9 लाख रुपयांची बॅग घेऊन तिने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
Image credit: Jahnavi Killekar Insta
बिग बॉसनंतर जान्हवी आता नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Image credit: Jahnavi Killekar Insta
जान्हवी स्टार प्रवाह चॅनेलवरील 'अबोली' मालिकेमध्ये इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटीलच्या भूमिकेत दिसणार आहे.
Image credit: Jahnavi Killekar Insta
'आता होऊ दे धिंगाणा 3'च्या सेटवर तिने चाहत्यांना नव्या प्रवासाबाबतची माहिती दिली.
Image credit: Jahnavi Killekar Insta
'भाग्य दिले तू मला', 'आई माझी काळूबाई' या मालिकांमध्येही जान्हवीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
Image credit: Jahnavi Killekar Insta
'बिग बॉस मराठी 5' नंतर तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
Image credit: Jahnavi Killekar Insta
जान्हवी 'अबोली' मालिकेमध्ये सकारात्मक भूमिकेत दिसणार की व्हिलनचीच भूमिका साकारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Image credit: Jahnavi Killekar Insta
कारण 'होऊ दे धिंगाणा'च्या सेटवर तिने 'अबोली' मालिकेतील सर्वांची वाट लावणार असल्याचे म्हटले.
Image credit: Jahnavi Killekar Insta
आणखी वाचा
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री नेमके काय करते, किती आहे श्रीमंत?
marathi.ndtv.com