Bigg Boss Marathi 5: तब्बल 2 आठवडे रितेश भाऊ गायब, महाअंतिम सोहळ्यात दिसणार की नाही?
Edited by Harshada J S
Image credit: Riteish Deshmukh Instagram
'बिग बॉस मराठी सीझन 5'चा महाअंतिम सोहळा 6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
महाअंतिम सोहळ्यामध्ये 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा होस्ट रितेश देशमुख दिसणार की नाही? याबाबत चर्चा सुरू होती.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
अखेर रितेश देशमुखने सर्व चर्चांना पूर्णविराम देत महाअंतिम सोहळ्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रितेश देशमुखने फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
बिग बॉस मराठी महाअंतिम सोहळ्यासाठी सज्ज, असे रितेशने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
तब्बल दोन आठवड्यानंतर रितेश भाऊ प्रेक्षकांना भेटणार आहे.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
आर्या जाधवला बिग बॉसने घराबाहेर काढले, त्यावेळेस रितेश देशमुखवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
यानंतर सोशल मीडियावर 'बिग बॉस बॉयकॉट' असा ट्रेंड देखील सुरू झाला होता.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश दिसलाच नाही. रितेश देशमुख परदेशात असल्याचे कारण बिग बॉसने सांगितले होते.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
तब्बल 2 आठवड्यानंतर अखेर महाअंतिम सोहळ्यामध्ये रितेश भाऊची भेट होणार असल्याने चाहते खूश आहेत.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
आणखी वाचा
सई ताम्हणकरचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट
marathi.ndtv.com