सैफ अली खानच्या घरात 'या' मार्गाने घुसला हल्लेखोर?
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याचा मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Image credit: PTI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोर पाइपलाइनच्या मदतीने सैफच्या घरात घुसला.
Image credit: PTI ही पाइपलाइन थेट सैफच्या बेडरुमपर्यंत जाते, असे म्हटले जात आहे.
Image credit: PTI पण चोर सैफच्या घरामध्ये कसा पोहोचला, याबाबत पोलिसांनी अधिकृतरित्या निवेदन जारी केलेले नाही.
Image credit: PTI गुरुवारी (16 जानेवारी) पहाटे 2 वाजेच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला.
Image credit: Varinder Chawla चोराने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले, यानंतर सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Image credit: Varinder Chawla Image credit: Varinder Chawla धक्कादायक बाब म्हणजे सैफवर हल्ला करून चोर पसार झाला आणि त्याला कोणी पकडूही शकले नाही.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी वांद्रे पोलीस तपास करत आहेत.
Image credit: PTI आणखी वाचा
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचे या महिन्यामध्ये आहे लग्न?
marathi.ndtv.com