देशातील सर्वात महागडी हीरोइन, शर्यतीत दीपिका पादुकोणलाही टाकले मागे

Edited by Harshada J S Image credit: Priyanka Chopra Insta
Image credit: Priyanka Chopra Insta

इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्रा जवळपास 4 वर्षांनंतर भारतीय सिनेमामध्ये वापसी करतेय.

Image credit: Priyanka Chopra Insta

SSMB29 या आगामी सिनेमामध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

Image credit: Priyanka Chopra Insta

प्रियंका चोप्राने 'SSMB29' सिनेमासाठी मोठे मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे.

Image credit: Priyanka Chopra Insta

शर्यतीमध्ये तिने दीपिका पादुकोणलाही मागे टाकलंय आणि देशातील सर्वाधिक महागडी अभिनेत्री ठरलीय. 

Image credit: Priyanka Chopra Insta

रिपोर्ट्सनुसार प्रियंकाने 'SSMB29' सिनेमासाठी जवळपास 30 कोटी रुपये फी घेतलीय. इतकी मोठी रक्कम आजवर कोणत्याही भारतीय अभिनेत्रीला मिळालेली नाही.

Image credit: Priyanka Chopra Insta

प्रियंकाची फी दीपिकाच्या मानधनाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे म्हटलं जातंय. कथित स्वरुपात दीपिका एका सिनेमासाठी 15-20 कोटी रुपये फी घेते. 

Image credit: Priyanka Chopra Insta

RRR आणि बाहुबली फेम एस.एस. राजमौली  'SSMB29' सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 

Image credit: Priyanka Chopra Insta

अभिनेता महेश बाबूचा हा 29वा सिनेमा आहे आणि सिनेमाचे बजेट जवळपास 1000 कोटी रुपये असल्याचे म्हटलं जातंय. 

Image credit: Priyanka Chopra Insta

'द व्हाइट टायगर' हा प्रियंकाचा शेवटचा भारतीय सिनेमा होता, जो हिंदी-इंग्रजी भाषेमध्ये रिलीज झाला होता. बॉक्सऑफिसवर हा सिनेमा फारशी कमाई करू शकला नाही.

आणखी वाचा

अंकुश चौधरीकडून चाहत्यांना बर्थडे गिफ्ट, प्रथमच झळकणार आगळ्यावेगळ्या भूमिकेत

marathi.ndtv.com