सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची घेतली शपथ
Edited by Harshada J S Image credit: Eknath Shinde Instagram 01/08/2024
सी.पी.राधाकृष्णन यांनी बुधवारी (31 जुलै) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram
राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram
शपथविधीनंतर महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते.
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram
आपल्या दीड वर्षांच्या कालावधीत त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणूनही अतिरिक्त कार्यभार सांभाळला.
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram
शपथविधीनंतर बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पावन जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रभूमीत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram
छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभावाचे सच्चे पुरस्कर्ते होते - राज्यपाल राधाकृष्णन
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram
गोरगरिबांच्या उन्नतीसाठी,अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करू-राज्यपाल
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram Image credit: Eknath Shinde Instagram
शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली.
01/08/2024 Image credit: Eknath Shinde Instagram आणखी वाचा
चोर समजून ठाण्यात एकाला मरेपर्यंत बेदम मारहाण, चौघांना अटक
marathi.ndtv.com