ठाणेकरांचा प्रवास होणार सुसाट, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे कॉरिडोरला मंजुरी

Edited by Harshada J S Image credit: Canva

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 हजार 200 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे कॉरिडोरला मंजुरी मिळाली आहे. 

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (16 ऑगस्ट) यासंदसर्भात बैठक पार पडली. 

Image credit: PM Narendra Modi Instagram
17/08/2024

तसेच 2 हजार 955 कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला (विस्तारित) देखील मान्यता मिळाली आहे. 

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

 एकूण 29 किमी लांबीच्या ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा 26 किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून 3 किमी लांबीचा मार्ग भूमिगत असणार आहे. 

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

उन्नत मार्गावर 20, तर भूमिगत मार्गावर 2 अशा 22 स्थानकांचा समावेश आहे.

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

अंदाजे 6.47 लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार असून 2029 पर्यंत मेट्रो सेवा कार्यन्वित होणार आहे.

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदाणी इस्टेट, कोलशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार आहे. 

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

प्रवाशांना किफायतशीर, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

Image credit: Canva
17/08/2024 प्रतिकात्मक फोटो

ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळावी, निधी उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पाठपुरावा केला होता. 

Image credit: CM Eknath Shinde Instagram
17/08/2024

आणखी वाचा

कानपूरजवळ साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली, हेल्पलाइन क्रमांक जारी

marathi.ndtv.com