सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ

Image credit: CMO Maharashtra 

CM एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे सिल्लोडमध्ये 2 ऑगस्टला आयोजन करण्यात आले होते.

Image credit: CMO Maharashtra  Edited by Harshada J S

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. 

Image credit: CMO Maharashtra 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख महिलांना या योजनेचा लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

Image credit: CMO Maharashtra 

विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे व लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.

Image credit: CMO Maharashtra 

छत्रपती संभाजीनगर विमानतळापासून ते सिल्लोडमध्ये कार्यक्रमस्थळी येईपर्यंत CM शिंदे यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

Image credit: CMO Maharashtra 

महिलांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. 

Image credit: CMO Maharashtra 

सिल्लोड येथील कार्यक्रमास महिला भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती होती. 

Image credit: CMO Maharashtra 

महिलांनी पारंपरिक पोषाख परिधान करून या कार्यक्रमात सहभागी झाल्या. 

Image credit: CMO Maharashtra 

व्यासपीठावर जाऊन अनेक भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून त्यांच्याशी संवाद साधला.

Image credit: CMO Maharashtra 

आणखी वाचा

सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

marathi.ndtv.com