ट्रेलर आणि ट्रकची जोरदार धडक, महिला-मुलांसह 13 जणांचा मृत्यू PHOTOS
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
रविवारी (11 मे) उशीरा रात्री रस्ते अपघातामध्ये महिला मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झालाय.
Image credit: PTI
छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यामध्ये ही दुर्घटना घडलीय.
Image credit: PTI
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जण जखमी देखील झाले आहेत.
Image credit: PTI
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलीय.
Image credit: PTI
जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
स्थानिक पुनीत साहूंच्या कुटुंबातील सदस्य कौटुंबिक कार्यक्रमासाठी ट्रेलरमधून प्रवास करत होते. जवळपास 35 जण ट्रेलरमध्ये होते.
Image credit: PTI
Image credit: IANS
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतांसह जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
Image credit: PTI
जखमींवर रायपुरातील डॉ. भीमराव आंबेडकर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत.
आणखी वाचा
Virat Kohli: 'तू कधीही न दाखवलेले अश्रू...' अनुष्का शर्माची विराट कोहलीसाठी भावुक पोस्ट
marathi.ndtv.com