मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री 15 ऑगस्टनंतर राज्याच्या दौऱ्यावर?
Edited by Harshada J S Image credit: CMO Maharashtra
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (6 ऑगस्ट) महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली.
Image credit: CMO Maharashtra
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह एकत्रित राज्याचा दौरा करतील, अशीही चर्चा झाली आहे.
Image credit: CMO Maharashtra
या दौऱ्याच्या तारखेबाबत अधिक घोषणा येत्या दोन दिवसांत होणे अपेक्षित आहे. 15 ऑगस्टनंतर दौऱ्याला सुरुवात होऊ शकते. - प्रसाद लाड
Image credit: CMO Maharashtra
सरकारमध्ये आलबेल नसल्याचा आरोप मविआकडून केला जातोय, त्यामुळे सत्ताधारी पक्ष एकजूट आहेत, असा संदेश या दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
Image credit: CMO Maharashtra
राज्य सरकारच्या विविध योजना व विकासकामांचा या दौऱ्यादरम्यान प्रचार केला जाईल.
Image credit: CMO Maharashtra
जनतेच्या भावना काय आहेत, याचा अंदाजही घेण्याचा महायुतीचा उद्देश आहे.
Image credit: CMO Maharashtra
दरम्यान जागावाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांव्यतिरिक्त कोणीही बोलू नये, यावर समन्वय समितीचे एकमत झाल्याची माहिती आहे.
Image credit: CMO Maharashtra
आणखी वाचा
मुख्यमंत्र्यांनी खडकवासला धरणाला भेट देऊन परिस्थितीचा घेतला आढावा