जीन्स धुताना 'या' गोष्टीची घ्या काळजी, कधीच जाणार नाही रंग

Edited by Harshada J S Image credit: Canva

प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये जीन्स असतेच असते. कॅरी करायला अतिशय सोपा असा हा पोशाख आहे. 

Image credit: Canva

जीन्स दररोज घातल्यामुळे खराबही होते आणि धुतल्यामुळे रंगही फिकट होऊ लागतो. 

Image credit: Canva

तुमच्या आवडीच्या जीन्सचा रंग फिकट होऊ नये, म्हणून तुम्ही देखील उपाय शोधताय का? चला तर जाणून घेऊया टिप्स...

Image credit: Canva

जीन्स धुतल्यानंतर थेट सूर्यप्रकाशामध्ये सुकवू नये. यामुळे जीन्सचा रंग फिकट होतो. जीन्स  सावलीमध्येच सुकवावी.

Image credit: Canva

मशीनऐवजी शक्यतो हातानंच जीन्स धुवावी आणि ब्लीच फ्री डिटर्जेंटचा वापर करावा. 

Image credit: Canva

जीन्स कधीही गरम पाण्यात धुण्याची चूक करू नये. 

Image credit: Canva

जीन्स कधीही उलट करून धुवावी. जेणेकरून बाहेरील रंगावर कमी परिणाम होईल आणि आतील बाजूही स्वच्छ होईल.

Image credit: Canva

जीन्स वारंवार धुणे टाळा. कारण यामुळेही जीन्स लवकर खराब होतात. 

Image credit: Canva

आणखी वाचा

हिवाळ्यातही काचेसारखा चमकेल चेहरा, फक्त वापरा ही कॅप्सुल

marathi.ndtv.com