एकाच तिकिटावर आता कुठेही फिरू शकता, मुंबईकरांसाठी फडणवीस सरकारची मोठी योजना

Edited by Harshada J S Image credit: CMO
Image credit: CMO

सह्याद्री अतिथीगृहावर 18 जानेवारीला इंटीग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्व्हिसेसशी संबंधित बैठक पार पडली. 

Image credit: CMO

CM फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. 

Image credit: Canva

शहरी वाहतुकीसाठी सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅपचा या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला. 

Image credit: Canva

मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बससह लोकल रेल्वेशी संबंधित प्रवास या एकाच अ‍ॅपद्वारे मुंबईकर करू शकतात. 

Image credit: Canva

सिंगल प्लॅटफॉर्म अ‍ॅपद्वारे मुंबईकरांना आपला प्रवास योग्यरित्या प्लॅन करता येणे शक्य होणार आहे.

Image credit: CMO

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे PM मोदींचे स्वप्न आहे: CM फडणवीस

Image credit: Canva

त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

Image credit: Canva

अ‍ॅपमुळे प्रवाशांना AIद्वारे जवळील स्टेशन किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबतची माहिती समजू शकेल.

Image credit: PTI

लवकरच हे अ‍ॅप प्रवाशांच्या सेवेसाठी लाँच करण्यात येईल, असेही CM फडणवीसांनी दिलीय.

आणखी वाचा

ओला-उबेरसाठी राज्य सरकार आणणार नियमावली, गैरप्रकारांना बसणार चाप

marathi.ndtv.com