ओला-उबेरसाठी सरकार आणणार नियमावली, गैरप्रकारांना बसणार चाप
Edited by Harshada J S
Image credit: Pratap Sarnaik X
Image credit: Canva
ओला, उबेर, रॅपिडोसारख्या खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
Image credit: Canva
प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचेही निर्देशही दिलेत.
Image credit: Canva
सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाइक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
Image credit: Pratap Sarnaik X
जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे, अशाही सूचना मंत्री सरनाईक यांनी बैठकीत दिल्या.
Image credit: Canva
बाइक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशाही सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.
Image credit: Canva
खासगी वाहतूक व्यवस्था, प्रवाशांची सुरक्षा याचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भात बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
Image credit: Canva
हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, झीरो कमीशन सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांनी बैठकीत सादर केला.
आणखी वाचा
ग्लॅमरचे जग सोडून ती झाली साध्वी? श्रद्धेवर उपस्थित केला जातोय प्रश्न
marathi.ndtv.com