CM शिंदेंनी लाडक्या बहिणींसोबत साजरा केला रक्षाबंधन सण
Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde 19/08/2024 Image credit: CM Eknath Shinde मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या वतीने रविवारी भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Image credit: CM Eknath Shinde यावेळेस उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.
Image credit: CM Eknath Shinde राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलीय - CM शिंदे
Image credit: CM Eknath Shinde आई-बहिणींचा आशीर्वाद कायम राहिला तर अवघे दीड हजार नव्हे तर तीन किंवा त्याहून जास्त आर्थिक मदतही करता येईल, असेही CM शिंदे म्हणाले.
Image credit: CM Eknath Shinde तसेच तुम्ही छोटामोठा व्यवसायही करू शकता, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
Image credit: CM Eknath Shinde आर्थिक मदत करणे एवढेच या भावाचे उद्दिष्ट नसून तुम्हाला लखपती बनवणे हे तुमच्या या भावाचे उद्दिष्ट आहे, असेही CM शिंदेंनी सांगितले.
Image credit: CM Eknath Shinde महिलांना लघु उद्योग उभारण्याला प्राधान्य देणे, आर्थिक मदत मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
Image credit: CM Eknath Shinde तसेच बचतगटांना भांडवल उपलब्ध करून देणे, त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे यासाठी देखील शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.
Image credit: CM Eknath Shinde अंधेरीतील या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
आणखी वाचा
PM मोदींचे शाळकरी विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधन सेलिब्रेशन
marathi.ndtv.com