सुनील पालच्या अचानक बेपत्ता होण्यामागील हे आहे खरं कारण, मुंबई पोलीस म्हणाले...

Edited by Harshada J S Image credit: Sunil Pal Insta
Image credit: Sunil Pal Insta

कॉमेडियन आणि अभिनेता सुनील मंगळवारी (3 डिसेंबर) बेपत्ता झाला होता. पालच्या पत्नीने सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारही नोंदवली होती.

Image credit: Sunil Pal Insta

तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. ताज्या घडामोडींनुसार सुनील पालने मुंबई पोलिसांशी संपर्क साधलाय.

Image credit: Sunil Pal Insta

फोन खराब झाल्याने सुनील पालसोबत संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. 

Image credit: Sunil Pal Insta

सुनील पाल कार्यक्रमानिमित्त मुंबई बाहेर गेला होता. यादरम्यान त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती त्याच्या पत्नीने दिली. 

अनेक तास पालचा फोन बंद होता, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. म्हणून तिनं तातडीने पोलीस स्टेशन गाठले. 

Image credit: Sunil Pal Insta
Image credit: Sunil Pal Insta

दरम्यान सुनील पालशी संपर्क साधण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील पाल बुधवारी (4 डिसेंबर) मुंबईत परतणार आहे. 

आणखी वाचा

समुंदर में नहा के! स्मिता गोंदकरचा बोल्ड लुक

marathi.ndtv.com